सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एन.एम.सी. ची मंजुरी -आ. वैभव नाईक

0
63
आमदार वैभव नाईक
सार्वजनिक बांधकाम कार्यालयात तोडफोड प्रकरणी आ. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

खा.विनायक राऊत यांच्या प्रयत्नांना यश

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या एन.एम.सी. (नॅशनल मेडिकल कमिशन) ने मंजुरी दिली आहे. त्यामुळे २०२१-२२ पासून हे महाविद्यालय सुरु होणार असून या महाविद्यालयामध्ये एम.बी. बी.एस.च्या १०० जागा असणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, खा.विनायक राऊत, ना.उदय सामंत, आ.दीपक केसरकर व आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली असून सर्वांचे आभार मानले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन व्हावे अशी मागणी खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे त्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या वेळी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक प्रस्ताव देण्यात आले.या महाविद्यालयाला तात्काळ कॅबिनेट मध्ये देखील मंजुरी देण्यात आली. हे महाविद्यालय ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या २० एकर जागे मध्ये होणार आहे. जिल्हा रुग्णालयाची जागा याआधी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ९६६ कोटिंची तरतूद बजेट मध्ये करण्यात आली आहे. जुलै महिन्यात एन.एम.सी च्या कमिटीने ओरोस येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक बाबींची पाहणी केली होती.काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली. तद्नंतरही नॅशनल मेडिकल कामिशनच्या परवानगीसाठी अनेक अडचणी येत होत्या. यासाठी खा.विनायक राऊत सातत्याने आढावा घेऊन पाठपुरावा करत होते. लोकसभेतही त्यांनी याबाबत आवाज उठविला.आता एन.एम.सी. ची मंजुरी मिळाल्याने यावर्षी पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार आहे. यामुळे खा.विनायक राऊत, ना.उदय सामंत, आ.दीपक केसरकर,व आपण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. असे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here