सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न

0
177

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु असून त्याबाबतची पुढील कार्यवाही व नियोजनाच्या दृष्टीने आज राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या समवेत खासदार विनायक राऊत,सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांची मुंबई येथे मंत्रालयात बैठक संपन्न झाली.

याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालाचा स्टाफ, नूतन इमारत, व्दितीय वर्षासाठी लागणाऱ्या आवश्यक सोयी सुविधा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. एम. पी. एस. सी. च्या माध्यमातून भरतीच्या प्रस्तावाबाबत देखील चर्चा झाली.खा.विनायक राऊत, ना. उदय सामंत, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, यांनी विविध सूचना मांडल्या त्याबाबत कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले. तसेच मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना महाविद्यालयाबाबत आवश्यक सूचना यावेळी दिल्या.

        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here