सिंधुदुर्ग: शास्‍त्रीय कला, चित्रकला, व लोककलेचे सवलतीच्‍या गुणांचे प्रस्‍ताव सादर करण्‍यास मुदतवाढ

0
140

सिंधुदुर्ग: महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्‍न असलेल्‍या सर्व माध्‍यमिक शाळेचे मुख्‍याध्‍यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्‍यात येते की, शास्‍त्रीय कला, चित्रकला, व लोककलेचे सवलतीच्‍या गुणांचे प्रस्‍ताव विद्यार्थ्‍यांनी शाळेकडे सादर करण्‍यास व शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी मुदतवाढ देण्‍यात येत आहे.

शासन निर्णयानुसार शास्‍त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्‍य मिळविणा’-या व लोककला प्रकारात सहभागी होणा-या विद्यार्थ्‍यांना सवलतीचे अतिरिक्‍त गुण देण्‍याचे प्रस्‍ताव विभागीय मंडळाकडे सादर करण्‍याची अंतिम मुदत दि. १५ जानेवारी २०२२ पर्यंत देण्‍यात आली होती. शास्‍त्रीय कला, चित्रकला, व लोककलेचे सवलतीच्‍या गुणांचे प्रस्‍ताव विद्यार्थ्‍यांनी शाळेकडे सादर करण्‍यास दि. ३१ मे २०२२ पर्यंत आणि शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी दि. ६ जून २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्‍यात येत असल्याचा निर्णय शासनाने दि. २६ एप्रिल २०२२ रोजीच्‍या पत्रान्‍वये जाहीर केले आहे.

त्‍यानुसार शास्‍त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे परिपूर्ण प्रस्‍ताव माध्‍यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे निर्धारित मुदतीत सादर करावयाचे आहेत. यानंतर मुदतवाढ देण्‍यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. तरी मार्च- एप्रिल २०२२ मधील माध्‍यमिक शालान्‍त प्रमाणपत्र परीक्षेसाठी (इ.१० वी) प्रविष्‍ठ सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्‍याध्‍यापक, सर्व माध्‍यमिक शाळा यांनी नोंद घेऊन त्‍याप्रमाणे उचित कार्यवाही करावी. कोणताही पात्र विद्यार्थी सदर गुणांच्‍या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची सर्व शाळाप्रमुखांनी दक्षता घ्‍यावी. अशी माहिती विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्‍नागिरी यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here