प्रतिनिधी पांडुशेठ साठम
देवगड: शनिवार दिनाक १२/०३/२०२२ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता शिरगाव हायस्कूल शिरगाव मधील इयत्ता १० वी मधील विद्यार्थ्यांना शुभेच्छा प्रदान करण्याचा कार्यक्रम शिरगाव हायस्कूल च्या सभागृहात संपन्न झाला. संस्थेचे उपाध्यक्ष माननीय संभाजी साटम यांच्या अध्यक्षते झाली व शाळेचे अधीक्षक माननीय रवींद्र जोगल, मुंबई संस्था कार्यकारणी सदस्य वसंत साटम, शाळा समिती सदस्य माननीय संदीप साटम, माननीय शैलेंद्र जाधव, माननीय मंगेश लोके, स्थानिक समिती अध्यक्ष संतोष फाटक, शाळेचे पर्यवेक्षक रावराणे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला.
या वेळी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. या वेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिरवाडकर सर, धुरी मॅडम, हेमंत सावंत सर, शैलेंद्र जाधव यांनी भविष्यात विद्यार्थ्यांनी कसे घडले पाहिजे या बाबत मार्गदर्शन केले. व त्यांना १५ मार्च पासून सुरू होत असलेल्या शालांत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संभाजी साटम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्याचा निकाल हा संख्यात्मक मिळवताना गुणात्मक ही प्राप्त झाला पाहिजे मेहनत करा व आपल्या ला आता पर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली त्यांना कधीच विसरू नका व भविष्यात मोठे झाल्यावर तुम्हाला ही मदतनीस बनले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १० वी मधील विद्यार्थिनी स्वेता गोडे हिने केले तर आभार कुमारी पवार हिने मानले व अध्यक्षाच्या परवानगीने मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची सांगता झाली


