वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कोलगेकर
वेंगुर्ला– लोकराज्य मंचच्यावतीने कृषी दिन साजरा करण्यात आला. शेतक-यांचे प्रश्न निवारण्याकरीता शेतक-यांशी थेट संवाद साधणे गरजेचे असल्याचे मत लोकराज्य मंच मुख्यप्रमुख डॉ.श्रीनिवास गावडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला लोकराज्य मंच प्रांतपाल शिवराम आरोलकर, मंचचे प्रमुख आनंद मोचेमाडकर, उपप्रमुख दशरथ नाईक, शेखर चोपडेकर, निता कार्डेज, मंच सचिव राजेश परब आदी उपस्थित होते.


