सिंधुदुर्ग: सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर 10 दिवसात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले होते.त्यानुसार आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद पुर्ण झाला असून, उद्या दुपारी तीन वाजता अंतिम निकाल जिल्हा सत्र न्यायालय सुनावणार आहे.
18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे.