सिंधुदुर्ग: संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा

0
91
संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा

प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ : मराठी भाषेला गौरवशाली इतिहास आणि परंपरा लाभलेली आहे. आजच्या पिढीपर्यंत ती पोहोचवताना तिच्या विकासाचाही प्रयत्न केला पाहिजे . त्यासाठी तिचे उपयोजन सातत्याने करायला हवे जेथे आवश्यक आहे तेथे मराठी शब्द आवर्जून वापरले पाहिजेत .वेगवेगळ्या बोली भाषा अभ्यास त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक ना. बा. रणसिंग यांनी केले. संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते .यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी.डिसले ,मराठी विभागप्रमुख डॉ.शरयू आसोलकर प्रा.संतोष वालावलकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी.डिसले यांनी बोलीभाषेचे माधुर्य आजच्या विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे असे सांगत बहिणाबाई चौधरींच्या मन वढाय वढाय या कवितेची आठवण करुन दिली.यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त घेण्यात आलेल्या देशभक्तीपर कवितालेखन स्पर्धेतील विजेत्यांना तसेच जाहिरात लेखन स्पर्धेतील विजेत्यांना ग्रंथभेट व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभागप्रमुख डाॅ. शरयू आसोलकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.संतोष वालावलकर यांनी केले.यावेळी ज्येष्ठ प्राध्यापक व्ही.बी झोडगे,प्रा.डाॅ व्ही.जी. भास्कर,प्रा.डाॅ. जमदाडे ,प्रा.डाॅ.बी.ए.तुपेरे, डाॅ.के.एम.चव्हाण ,प्रा.यु.एम.कामत आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. मराठी विभागातर्फे दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.27 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी बोलतो मराठी हा भाव व्यक्त करणारी सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here