सिंधुदुर्ग- महिलांना कौटुंबिक वाद आणि मारहाण त्याशिवाय भावनिक साथीसाठी सखी वन ची स्थापना करण्यात आली आहे .या सखीने कुडाळ तालुक्यातील आंब्रड गावच्या एका पीडितेला आधार आणि न्याय मिळवून दिला आहे. सदर पीडिता दि. 23 मार्च रोजी सखी वन स्टॉप सेंटरमध्ये आली. संबंधित पीडितेस दि. 21 मार्च रोजी पतीने मारहाण करून घराबाहेर काढले होते.
या पीडितेचे व तिच्या पतीचे समुपदेशन करून त्यांचा संसार वाचवण्यात सखी वन स्टॉप सेंटरच्या कर्मचाऱ्यांना यश आले आणि 25 मार्च रोजी ही पीडिता आपल्या पतीसोबत पुन्हा घरी परतली. सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर सदर महिलेचे एमएलसी करून महिलेला आवश्यक ते औषधोपचार देण्यात आले. त्यानंतर महिलेचे समुपदेशन करून महिलेच्या पतीला व सासऱ्यांना बोलावून त्यांचे देखील समुपदेशन करण्यात आले. पीडितेचा पती व पीडिता यांचे सतत दोन दिवस समुपदेशन केल्यानंतर पीडिता पतीसोबत सासरी जाण्यास तयार झाली. तसेच पुन्हा या प्रकारचे कृत्य आपल्या हातून होणार नाही याची खात्री पीडितेच्या पतीने दिली व पीडितेस नांदावयास घरी नेले.
सदर महिलेचा संसार वाचवण्यामध्ये वन स्टॉप सेंटर चेकेंद्र प्रशासक ॲड.पूजा काजरेकर, समुपदेशक ॲड रुपाली प्रभू, केस वर्कर ॲड.मीनाक्षी नाईक, चैत्राली राऊळ, परिचारिका स्नेहा मोरे, योगिता परब, पॅरालेगल लॉयर ॲड. सुवर्णा हरमलकर व मेड सरिता कुंभार या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. या कामी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, तसेच विधी सल्लागार सौ.श्रीनिधी देशपांडे यांनी सल्ला देत मदत केलीया घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.


