प्रतिनिधी पांडुशेठ साठम
देवगड: सरिता हॉस्पिटल देवगड मधील सिटीस्कॅन मशिनचा शुभारंभ Apple सरस्वती कोल्हापूर, चे संचालक डॉक्टर अशोक भूपाळी यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी सरिता हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर के. एन. बोरफळकर उपस्थित होते.देवगड सारख्या भागा मध्ये डॉक्टर बोरफळकर सरांनी उचललेल मोठ पाऊल आहे. सर्व सामान्य जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
देवगड मध्ये सिटीस्कॅन ची सोय उपलब्ध झाल्याने जैतापूर नाटे संपूर्ण देवगड तालुका भागातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे. देवगड सारख्या ग्रामीण भागात असणारी ही सुविधा केवळ सेवाभाव म्हणून करण्यात करण्यात आली आहे.
ऑपरेटिंग रूमचा शुभारंभ देवगड मधील ज्येष्ठ नागरिक दादा पारकर यांच्या हस्ते करण्यात आला. धन्वंतरीच्या मूर्तीचे पूजन व दिपप्रज्वलन डॉक्टर अशोक भूपाळी यांनी केले.
यावेळी देवगड मधील ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट अविनाश माणगावकर बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर जोशी, डॉक्टर किरण मराठे, डॉक्टर प्रमोद आपटे, डॉक्टर संदीप बोरफळकर, श्रीपाद पारकर यांच्यासह देवगड मधील सर्व वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.
फोटो – वैभव केळकर देवगड


