ओरोस: जिल्ह्यातील नागरी संरक्षण दलाचे कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याकरीता नागरी संरक्षण कार्यालयातील लिपीक टंकलेखक, दोन पदे व चौकीदार, शिपाई एक पद असे एकुण तीन पदे बाह्यस्थ यंत्रणेमार्फत निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दीतीने सेतू समितीमार्फत भरती करण्यात येणार आहे. विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर https:// sindhudurg.nic.in येथे उपलब्ध आहे.
फॉर्म डाऊनलोड करुन घेवून परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग सामान्य शाखा येथे 12 ऑगस्ट 2022 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा सेतू समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
लिपीक टंकलेक – 1) मासीक मानधन,15,000/- कालावधी 11 महिने. शैक्षणीक अर्हता. कोणत्याही शाखेचा पदवीधर, एम .एस. सी आय.टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेची मराठी 30 व इंग्रजी 40 टायपिंग चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 2) उमेदवाराचे वय 30 जून 2022 या तारखेस 18 वर्षोपेक्षा कमी व 43 वर्षा पेक्षा जास्त नसावे. कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 3) उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असवा. तोंडी मुलाखत 30 गुणांची असेल.
चौकीदार/ शिपाई- 1) मासीक मानधन 10,000/- कालावधी 11 महिने. 2) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. 3) चारचाकी वाहन चालकाचा परवाना असल्यास प्राध्यन्य. मराठी, हिंदी भाषेचे ज्ञान अवगत असावे. 4) उमेदवाराचे वय 30 जून 2022 या तारखेस 18 वर्षोपेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. 5) उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. 6)उमेदवार हा शरीरिकदृष्टया सदृढ असावा. तोंडी मुलाखत 30 गुणांची असेल
एखाद्या उमेदवाराने / अर्जदाराने त्याची निवड करण्यासाठी निवड समितीवरील अध्यक्ष, सदस्य तसेच अधिकाऱ्यांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष राजकीय अथवा अन्य प्रकारे दबाव अणल्यास अथवा गैरप्रकारचा अवलंब केल्यास त्यास निवड प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात येईल.
अर्जामध्ये नमुद केलेली तसेच अर्जासोबत दिलेली माहिती अथवा प्रमाणपत्रे चुकीची अथवा खोटी अढळून आल्यास संबंधित उमेदवार दंडात्मक कारवाईस पात्र राहील. तसेच चुकीच्या माहितीच्या अधारे निवड झाली असल्याचे नंतर आढळून आल्यास संबंधित उमेदवारास तात्काळ कमी करण्यात येईल. संबंधित उमेदवार भारतीय दंड संहितेचे कलम 199, 200 (2) अन्वये शिक्षेस पात्र राहील.
दि.17 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2022 रोजी अर्ज छाननी, दि. 19 ऑगस्ट 2022 यादी प्रसिध्द दि.22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजलेपासून पात्र उमेदवारांची तोंडी मुलाखत आणि दि. 23 ऑगस्ट रोजी गुणवत्ते नुसार पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करणे किंवा भरती प्रक्रिया रद्द करणे याबाबतचे सर्व अधिकार जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी राखून ठेवलेले आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


