सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक -युवतींसाठी राष्ट्रीय स्तरावर YOUNG ENTREPRENEURS LEAGUE (AYE LEAGUE) ही स्पर्धा आयोजित

0
66

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक- युवतींमध्ये उद्योजकतेचा विकास व्हावा या उद्देशाने Ambedkar social Innovation and Incubation Mission (ASIIM) लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत नाविनयपूर्ण कल्पनांवर काम करु इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाती युवक -युवतींसाठी राष्ट्रीय स्तरावर YOUNG ENTREPRENEURS LEAGUE (AYE LEAGUE) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील उद्योजकांच्या योगदानाचे महत्व जाणून सुक्ष्म व लघू उद्योग श्रेणीमध्ये उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत उद्योजकांसाठी AMBEDKAR BUSINESS EXCELLENCE AWARDS देण्यात येणार आहेत. या संदर्भातील अधिक माहितीसाठी दलित इंडियन चंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रि संस्थापक आणि अध्यक्ष, मिलिंद कांबळे मो.9850541474, राष्ट्रीय अध्यक्ष रवी कुमार नरा, मो. 9391020941 आणि व्यवस्थावकीय संचालक शिवेंद्र तोमर, आयएफसीआय व्हेंचर कॅपिटल फंड मो.9990725923 यांचकडे उपलब्ध होऊ शकेल.

तरी जिल्हयातील अनुसूचित जाती प्रवर्गाती सूक्ष्म व लघु उद्योग श्रेणीमध्ये उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजकांनी जास्तीत जास्त वरिल दोन्ही उपक्रमांत सहभागी व्हावे असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here