सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून २४,२५,२६,फेब्रुवारी तीन दिवस उद्योजकता विकास शिबीर आयोजित केले आहे.त्यासाठी माझ्या केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या दिल्ली येथील कार्यलयातून ६० अति वरिष्ठ आणि वरिष्ठ अधिकारी दाखल होणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला उद्योजक घडविण्यासाठी एमएसएमईच्या वतीने उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन केले जाणार आहे असे केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील नागरिकांना आवाहन केले आहे
कोकणात उत्पादन होत असलेल्या नारळ,काजू,फुले, यासह बांबू ,मातीच्या वस्तू या सहा इतर सर्व प्रकारचे उद्योग करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे आणि उत्पादन केलेला माल विक्री करण्यासाठी उद्योग मंत्रालय सहकार्य करणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त जनतेने उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची ओसरगाव येथील महिला भवन येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली,ववकील संग्राम देसाई,डॉ.मिलिंद कुलकर्णी, एम एस एम ई चे ओएचडी सचिन बदाणे,खादीग्राम उद्योग चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय हेडाऊ,खादीग्रामोउद्योगचे राज्य संचालक मनीष कांबळे उपस्थितीत होते. २५ फेब्रुवारी रोजी कुडाळ नवीन एसटी स्टँड येथे कॉयर उद्योग प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी १० वाजता होणार आहे. त्याला ते उपस्थितीत राहणार आहेत हे प्रदर्शन आठ दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतर कुडाळ एमआयडीसी येथे १०.३० वाजता कोनबँक स्फूर्ती बांबू क्लस्टरचे उदघाटन केले जाणार आहे. आसाम येथील सर्वात चांगला बांबू आहे त्याचे वाटप केले जाणार आहे.त्यानंतर ओरोस येथे शरद कृषी भवन मध्ये उद्योजकता विकास कार्यशाळेचा मुख्य कार्यक्रम सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. यावेळी विविध प्रशिक्षणे झाली आहेत. त्याची प्रमाणपत्रे वितरण,मधमाशा पालन करण्यासाठी पेट्या,कुंभार उद्योगासाठी चाके,अगरबत्ती तयार करणारी मशीन,शेतकऱ्यांना बांबू रोपांचे वाटप, केले जाणार आहे.त्यानंतर दुपारी १२ वाजता याच ठिकाणी एम एस एम इ आणि ईडीपी कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. रूपे कार्ड आणि लॉन्च आणि उद्योजकांना रूपे कार्डचे वितरण केले जाणार आहे. गवती चहा पासून सेंट तयार केला जातो ते आसाम येथील उद्योजक माहिती देणार आहे.संध्याकाळच्या सत्रात कॉयर बोर्डचे सादरीकरण, एमएफडीसीचे सादरीकरण केले जाणार आहे. मशरूम उत्पादन कसे घ्यावे याचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आसाम येथील उद्योजिका येणार असून त्या मार्गदर्शन करणार आहेत असे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
२६ फेब्रुवारी रोजी कणकवलीत प्रहार भवन येथे कॉयर बोर्डाच्या प्रादेशिक कार्यालयाचे उदघाटन केले जाणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती,जमाती उद्योजकाचा विक्रेता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.तेथे सत्कार आणि अनुभव कथन केले जाणार आहे. उद्योग उभारणीत बँकांचा वाटा महत्वाचा असल्यामुळे बँकेचे प्रतिनिधी येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृह मंत्री अमित शाह, व राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मला हे केंद्रीय उद्योग मंत्री पद मिळालेले आहे.त्याचा योग्य उपयोग करून देश, राज्य आणि जिल्हा आर्थिक सक्षम करणे. देशातील ८० टक्के उद्योग माझ्या खात्यात येतात त्या सर्व उद्योगांना सहकार्य केले जाते.आपल्या कोकणात नारळाच्या भूशापासून प्लायवूड बनवता येईल,सुरंगी पासून सेंट तयार करता येईल केलेले उत्पादनाला बाजारपेठ सुद्धा दिले जाईल.यासह सर्व प्रकारचे उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाणार आहे.