सिंधुदुर्ग- अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग- ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून प्रवास करायचा असल्यास स्मार्टकार्ड असले पाहिजे तर सवलत मिळेल, अशी अट महामंडळाने घातली आहे. त्यामुळे या कार्डसाठी ज्येष्ठ नागरिक एसटी स्टॅंडमध्ये पायपीट करून दमले आहेत. कारण, इथले मशिन बंद असते. अनेकदा इंटरनेट नसल्यामुळे आठ दिवसांनी या, असे साचेबद्ध उत्तर दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, प्रवाशांना त्यांच्या गावातच स्मार्टकार्ड द्या, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक करत आहे. पुर्वी प्रमाणे आधारकार्ड, मतदान कार्ड च्या आधाराने जेष्टनागरिकांना सवलत दिली जायची या पुढेही आधारकार्ड मतदानकार्ड स्मार्टकार्ड समजून सवलत द्यावी अधिक कार्ड कशाला बाळगायला हवीत याचा मंडळाने विचार करावा उतार वयात सुखाचा प्रवास करू द्यावा अशी मागणी जेष्टनागरिकांची आहे.


