प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
हायस्कूल मध्ये अजय जगन्नाथ राठोड या मुलाने 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
वेंगुर्ले- वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथील स.का.पाटील विद्यामंदिर केळूस या हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. केळूस हायस्कूलची एकूण सर्व म्हणजे ३६ मुले उत्तीर्ण झाली आहेत आणि हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे.
या हायस्कूल मध्ये अजय जगन्नाथ राठोड या मुलाने 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रुती संतोष केळुसकर या मुलीने 91.40 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तसेच योगिता रवींद्र तळवडेकर या मुलीने 87 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.तर प्रणिला प्रकाश मांजरेकर या मुलीला 86.60 टक्के तर हिमानी नाना कुबल या ही मुलीला 86.60 टक्के गुण असे समसमान गुण मिळविले आहे. त्यामुळे या दोन्ही मुलीनी चतुर्थ क्रमांक मिळवला आहे. केळूस हायस्कूल मध्ये वसंत प्रकाश मातोंडकर 85.20 टक्के गुण मिळवून पाचवा आला आहे.


