सिंधुदुर्ग: MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार दि.23 जानेवारी रोजी

0
84

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 ही रविवार दि.23 जानेवारी 2022 रोजी होत आहे.कणकवली तालुक्यातली विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला व कणकवली कॉलेज कणकवली, या दोन उपकेंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची वेळ सकाळी 10 ते दुपरी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 अशी आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी कळविले आहे.

सदर बसलेल्या परीक्षार्थींचे बैठक क्रमांक KD001001 ते KD001432 विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली,येथे आले आहेत तर कणकवली कॉलेज कणकवली येथे बैठक क्रमांक KD002001ते KD002407 या उपकेंद्रावर आले आहेत

या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

आयोगामार्फत आयोजित परीक्षामध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
– अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे.
– परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत.
– परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून तपासणी (Frisking)करण्यात येणार आहे.
– उमेदवाराला स्तत:चा जेवणाचा डबा, अप्लोपहार व पाण्याची बाटली आणण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. दोन पेपरच्या मधल्या वेळामध्ये उमेदवारांना परीक्षा – – -उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे.
आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे ही निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here