सिंधुदूर्ग जिह्यातील अपरिचित पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी दिशादर्शक बोर्ड लावण्याच्या पर्यटन संचनालायाकडे केलेल्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद – श्री विष्णू मोंडकर जिल्ह्याध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग.

0
829

प्रतिनिधी–शशांक कुमठेकर, देवबाग

सिंधुदूर्ग जिल्हा हा राज्य व केंद्र सरकारकाने पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता दिली असून केंद्र सरकारच्या पर्यटन वाढीसाठी दत्तक घेतलेल्या जिल्ह्यात देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाला आहे.
दरवर्षी 10 लाखापेक्षा जास्त देश विदेशी पर्यटक या जिल्ह्यात पर्यटनासाठी येतात प्रामुख्याने येणाऱ्या पर्यटकांचा ओढा सागरी पर्यंटनासाठी असतो सागरी पर्यटना बरोबर या जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील हिस्ट्री ,कल्चर,एग्रो,मेडिकल,ऍडव्हेंचर तसेच बीच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या पर्यटकाला पर्यटन स्थळी जाण्यासाठी तसेच रस्त्याच्या ठिकाणी दोन तीन रस्ते असतील तर अशा ठिकाणी बोर्ड लावणेसाठी पर्यटन व्यवसायिक महासंघाकडून, पर्यटन संचनालाय महाराष्ट्र कडे केलेल्या मागणीस मान्यता मिळाली हा सर्व खर्च सरकारच्या माध्यमातून होणार आहे. या विषयी जिल्ह्यातील सर्व व्यापारी ,पर्यटन व्यावसायिक तसेच व्यापार वाढीसाठी काम करणाऱ्या संस्था यांनी आपल्या भागातील दिशादर्शक बोर्डाचे योग्य ठिकाण सुचवा जेणेकरून पर्यटकांना त्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी नियोजित प्रकारे जाता येईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची दिशा दर्शक फलकाचे ठिकाण सुचवण्यात यावे पर्यटन स्थळाचे नाव, रस्त्याचे नाव, ज्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावायचे आहे त्या ठिकाणचे नाव, साधारणता तिथून किती किलोमीटर अंतर अशी माहिती देण्याचे पर्यटन व्यवसायिक महासंघ, सिंधुदुर्ग मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

अश्या प्रकारे बोर्ड लावण्यासाठी आपल्या कडे जी काही ठिकाणे असतील त्याची विस्तृत माहिती किशोर दाभोलकर, सोशल मिडिया प्रमुख, यांचे 9404347199 ह्या व्हाट्सएप्प नंबर वर पाठवावी असे आवाहन श्री विष्णू मोंडकर, अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ , सिंधुदुर्ग यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here