सिंधुदूर्ग , रत्नागिरी जिल्हातील प्रकल्प ग्रस्थाांना न्याय मिळेलच – मा मंत्री बाळासाहेब थोरात महसूलमंत्री शिष्टमंडळा समक्ष दिले आदेश

0
117

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

कोल्हापूर : कोल्हापूर येथे अशोकराव जाधव काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र यांचे नेतृत्वाखाली अरूणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प वैभववाडी जिल्हा सिंधुदूर्गचे शिष्टमंडळ मा मंत्री बाळासाहेब थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र यांना भेटले.यावेळी तानाजी कांबळे अध्यक्ष,अजय नागप सेक्रेटरी, विलास कदम , प्रकाश सावंत , श्रीकांत बांद्रे , सुनंदा जाधव ,आरती घंबळे, सुचिता चव्हाण यांचे शिष्टमंडळ भेटले.

अरूणा प्रकल्पातील पाण्यात गेली चार वर्ष असलेली १३० घरे शासकीय वाहणाने मजूरी सह पुनर्वसन प्लॉट मध्ये नेऊन देण्याचे आदेश सर्व शिष्टमंडळासमोर अधिक्षक अभियेता जलसंपदा सिधुदूर्ग यांना दिले. डिपार्टमेंट सर्व प्रकारचे सहकार्य घरे वाहतूकीसह प्रकल्प ग्रस्थांना करेल असे आश्वासन चिफ इंजिनीयर मा.घोघरे यांनीही मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले.मा अशोकराव जाधव यांच्या प्रकल्पग्रस्थ संघटन आणि सामाजीक ऐक्यासाठी संविधान जन जागृती यात्रेमुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय व हक्क मिळण्यास सुरवात होत आहे .

शिष्टमंडळाने कणकवली तालुक्यातील नरडवे धरणाच्या प्रकल्पग्रस्थांच्या समस्या मंत्री थोरात साहेब यांच्या समोर मांडल्या व जो पर्यंत पुनर्वसनांचे प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत घळ भरणी करु नये असे आदेश देण्याची मागणी श्री अशोकराव यांनी केली . त्याच बरोबर रत्नागिरी जिल्हातील जामदा प्रकल्प काजीर्डा ता राजापूर धरणाच्या प्रकल्पग्रस्थांना धरणाचे काम ७० % पुर्ण झाले आहे पण धरण काम चालू होणे पुर्वी किमान ६ महीने ज्या कारणा करीता जमिन संपादीत करणेसाठी ४ / १ ची नोटीस द्यायची असते ती आज दिनांक ५ मे 2० 22 पर्यंत १८०० ( अठराशे ) कुटूंबा पैकी एकालाही दिलेली नाही ही बाब महसुल मंत्री यांचे समोर मा अशोकराव जाधव यांनी मांडली. तेंव्हा मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ज्यांनी धरण चालू करणेस परवानगी दिली व ज्यांनी प्रकल्पग्रस्थांना अंधारात ठेवून प्रकल्प ग्रस्थांची फसवणूक केली आहे त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असे मत व्यक्त केले.जे कामच बेकायदेशीर आहे ते काम पोलीसी बळ वापरुन कसे केले जाते असा प्रश्न शिष्टमंडळाच्या वतीने विचारला असता बेकायदेशीर कामाला ठेकेदाराने आणि प्रकल्प संस्थेने पोलीसी बळ वापरणे चुकीचे आहेच, पण पोलिसांनीही चुकीच्या कामाला चौकशी न करता संरक्षण देणे चुकीचे आहे या बाबतच्या सुचना डिपार्टमेंट व पोलीसांनाही द्याव्यात अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने आणि प्रकल्पग्रस्थांच्या वतीने अशोकराव जाधव यांनी केली.

शिष्टमंडळाशी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सविस्तर चर्चा करून तिथल्या तिथे आदेश दिले आणि प्रकल्प ग्रस्थांनवर अन्याय होऊ देणार नाही असे ठामपणे सांगितले त्यामुळे गेली कित्तेक वर्ष प्रलंबीत मागण्यांना अशोकराव जाधव यांच्या प्रकल्पग्रस्थ संपर्क यात्रेने न्याय मिळेल असे वाटू लागले आहे. यात त्यांना तानाजी कांबळे , अजय मागप , सुरेश ढवळ , अशोक आर्डी , विलास सावंत , हनुमंत , पेडणेकर , वालावलकर इत्यादी खंदे समर्थकांची साथ मिळाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here