सिद्धार्थनगर मध्ये आदरणीय अॅड . प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा 69 व्वा वाढदिवस साखर – पेढे वाटून उत्साहात साजरा करण्यात आला

0
100
सिद्धार्थनगर मध्ये आदरणीय अॅड . प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा 69 व्वा वाढदिवस साखर - पेढे वाटून उत्साहात साजरा

सिद्धार्थनगर मधील राजर्षी शाहू समाज मंदिर येथे 10 मे रोजी आदरणीय अॅड . प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरीकांना सरकारी योजनांची माहिती देऊन , प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले .

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महादेव कोल्हे ( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ) , एस.पी. कांबळे ( ज्येष्ठ पत्रकार ) , डि.एस. सरनाईक ( ज्येष्ठ नागरीक ) , शंकर इंगवले ( ज्येष्ठ नागरिक ) , मुरलीधर भोसले ( सामाजिक कार्यकर्ते ) हे उपस्थित होते .या कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद पोवार , मल्हार शिर्के , अमोल केरबा कांबळे , अमित काळे , अविनाश बनगे , सुरज इंगवले यांनी केले .

तसेच या कार्यक्रमास सिद्धार्थनगर मधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .यावेळी महादेव कोल्हे , एस.पी. कांबळे , मल्हार शिर्के , मिलिंद पोवार , अविनाश बनगे यांनी श्रध्येय अॅड . प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपली मनोगते व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here