अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केलं आहे. हिंदी चित्रपटांसोबत तिने मराठी चित्रपटामंध्ये देखिल काम केलं आहे. आता पुन्हा एकदा ती मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘ती मी नव्हेच’ या चित्रपटातून उर्मिला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परितोष पेंटर यांच्या लेखनीतून आलेला हा चित्रपटात उर्मिलासोबत श्रेयस तळपदे, निनिद कामत या कलाकारांचाही सहभाग असणार आहे.


