कोरोनाची चिंता वाढत चालली आहे.सिनेसृष्टीतील अनेक जण दिवसेंदिवस कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहेत.आज स्वरा भास्कर,मिथिला पालकर ,विवेक दडलानी सहित साऊथ सुपरस्टार महेश बाबूला कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः महेश बाबूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
सर्व आवश्यक खबरदारी घेतल्यानंतर देखील माझी कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणे आहेत. मी स्वत:ला घरी क्वारंटाइन ठेवले आहे आणि सर्व वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी अशी मी विनंती करतो. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून त्यांचा दवाखान्यात जाण्याचा धोका कमी होईल. कृपया कोविडचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा.” अशा आशयाची पोस्ट त्याने सोशल मीडियावर घातली आहे.


