सीएनजी गॅसवरील वाहन चालवणाऱ्या मुंबईकरांना मिळणार घरपोच सीएनजी इंधन

0
55

मुंबई- सीएनजी इंधनावर चालणाऱ्या टॅक्सी, रिक्षा, खासगी आणि व्यावसायिक वाहने आणि शालेय बसेस चालवणाऱ्या चालकांना आता लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. ‘सीएनजी गॅसची ही घरपोच सेवा 24 तास आणि आठवडाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे सीएनजी गॅसवरील वाहन चालवणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सीएनजी स्टेशनवर वाहनांच्या लांब रांगांमधून नागरिकांची सुटका होणार आहे. यापुढे आपात्कालीन परिस्थितीत ग्राहकांना सीएनजी उपलब्ध होणार आहे

आता मुंबईकरांना सीएनजीसाठी सीएनजी गॅस स्टेशनवर रांग लावण्याची गरज नाही. कारण यापुढे मुंबईकरांना घरपोच सीएनजी गॅस मिळणार आहे. एनर्जी स्टार्टअप ‘दी फ्यूल डिलिव्हरी’ने महानगर गॅस लिमिटेडसोबत एक करार केला आहे. त्यानुसार आता मुंबई शहरात मोबाइल सीएनजी स्टेशनची स्थापना करण्यात येणार आहे. या मोबाइल सीएनजी स्टेशनच्या मदतीने ग्राहकांना घरपोच सीएनजी इंधन पुरवण्यात येणार आहे.आम्ही देशभरातील विविध शहरांमध्ये घरपोच डिझेल पुरवठा सेवा सुरू केली. या योजनेला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता आम्ही सीएनजी गॅसचाही पुरवठा करणार आहोत. या योजनेलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फ्युएल डिलिव्हरीचे संस्थापक सीईओ रक्षित माथुर यांनी सांगितले कि ,येत्या तीन महिन्यांमध्ये मुंबईतील सायन आणि नवी मुंबईतील म्हापे येथे ही सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सेवा मुंबई, नवी मुंबईतील इतर भागांमध्येही सुरू करण्यात येणार आहे. सध्या मुंबई आणि जवळपासच्या परिसरात महानगर गॅस लिमिटेड हा मुख्य सीएनजी गॅस वितरक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here