सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री सौजन्याने आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांची चिठ्ठी लिहिली होती. मागील काही दिवसांपासून तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे या सुसाईड नोटवरुन स्पष्ट झाले आहे.छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री सौजन्याच्या आत्महत्या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे.
अभिनेत्रीच्या वडिलांनी तिचा सहकारी अभिनेता विवेक आणि सहाय्यक महेश यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस कन्नड आणि तेलुगू छोट्या पडद्यावरील अभिनेते विवेक आणि महेश यांची चौकशी करत आहे. तिचे सोन्याचे दागिनेही गायब आहेत. महेशने पोलीस येण्याची वाटही बघितली नाही आणि त्यांनी माझ्या मुलीचा मृतदेह ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या ठिकाणाहून काढला. विवेक सौजन्याशी लग्न करण्यासाठी तिच्यावर अत्याचार करत होता. सौजन्याचा मोबाईल गायब आहे. एकदा तो सापडला की सर्वकाही बाहेर येईल. असे आरोप वडिलांनी केले आहेत.दरम्यान, पोलिसांनी आई-वडिलांच्या उपस्थितीत अपार्टमेंटची तपासणी केली.शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी म्हटले आहे की त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सौजन्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले, ‘हे पाऊल उचलल्याबद्दल मला खूप खेद वाटतोय. पप्पा मी तुमच्यावर खूप प्रेम करते. जसे मी तुम्हाला सांगितले होते की, मी आता हे सहन करू शकत नाही. खूप कठीण होत आहे अप्पा. सॉरी आई, मी म्हटल्याप्रमाणे मी आज येईन पण, मला माहित नव्हते की मी या मार्गाने येईन. मला माफ कर आई, मला याबद्दल खूप खेद वाटतोय. पप्पा कृपया आजीची काळजी घ्या.मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. माझी मानसिक स्थिती ठीक नाहीये. हेल्थ इश्यू मला आतून मारत आहेत. म्हणून मला हे पाऊल उचलणे योग्य वाटत आहे. तुम्ही लोक मला माफ कराल. पप्पा, मम्मी मला माफ करा … प्रत्येक गोष्टीसाठी आय लव्ह यू’