सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू

0
86

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या दोन संवर्गाच्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) लागू करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. यासंदर्भात संबंधित संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी व इतर बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगाकडून पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
(१) लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या तीन संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
(२) टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ अर्हताकारी/पात्रता (Qualifying) स्वरुपाची असेल.
(३) लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भरावयाच्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरविण्यात येतील.
(४) लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखन (इंग्रजी) व कर सहायक संवर्गाकरीता स्वतंत्रपणे टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येतील. कर सहायक संवर्गाकरीता मराठी व इंग्रजी या दोन्ही चाचणीमध्ये अर्हताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक असेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here