सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावात बसविलेले हायमास्ट महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आर्थिक सहकार्याने पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.
सोनुर्ली गावात बसविण्यात आलेले हायमास्ट हे कालांतराने बंद पडले होते. ग्रामस्थांनी हे हायमास्ट पुन्हा सुरु करण्यासंदर्भात केसरकर यांच्याकडे मागणी केली होती, त्यावेळी दिवे पुन्हा सुरु करण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करु असे आश्वासन दीपक केसरकर यांनी ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार त्यांनी आपले आश्वासन पूर्ण करुन देतहायमास्ट पुन्हा सुरु केले. हे हायमास्ट सुरु झाल्याने सोनुर्ली गावातील ग्रामस्थ गावकर मंडळी यांनी केसरकर यांचे आभार मानले आहेत.


