लग्नसराईचे दिवस असल्याने सध्या सोन्याचे दर पन्नास हजारांच्या घरात पोहोचले होते. जून महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर 49 हजार रुपयांवर पोहोचले होते, पण आता सोन्याचे दर 47 हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत. तसेच चांदीच्या किमतीत देखील घट झाली आहे. चांदीचा दर दोन आठवड्यांपूर्वी 72 हजार रुपये प्रति किलोवर होता. तर आज चांदीचे दर 68 हजारांवर पोहोचले आहेत.