स्वच्छ भारत अभियन अंतर्गत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यातून सागर किनाऱ्यांची स्वच्छता राबवावी

0
86

सिंधुदुर्ग– आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नेहरू युवा केंद्राने विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम राबवावी. यासाठी शाळा, स्थानिक प्रशासन यांचे सहकार्य घ्यावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिले. नेहरू युवा केंद्रामार्फत जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आज झाली.

सिंधुदुर्ग जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी यांनी या बैठकीत 2021 – 22 वार्षिक कृती योजना आराखडा सादर केला. या बैठकीत जिल्हा कृती आराखडा आझादी का अमृत महोत्सव, स्वच्छ भारत कार्यक्रम यावर चर्चा करण्यात आली. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत ग्रामपंचायत,शाळा, स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवावी. जनजागृतीसाठी दशावतार, कळसुत्री बाहुल्या अशा पारंपरिक कलेचा वापर करावा, अशा सूचना श्री. भडकवाड यांनी दिल्या.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक परशुराम गावडे, जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, सहायक युवा अधिकारी अपेक्षा मांजरेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here