राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी धोका अद्याप कायम आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे.त्यातच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गेल्या वर्षी देखील सणासुदीच्या काळातच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑगस्ट महिन्यात गौरी-गणपती आहे.
ज्यादिवशी 7 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल, त्यादिवशी राज्यात लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावावे लागतील. याबाबत राज्य सरकारनं नोटिफिकेशनमध्ये आधीच स्पष्ट केलं आहे. सणासुदीच्या काळात तुर्तास कोणतेही कठोर निर्बंध लागू करण्यात येणार नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहेत.
राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. अशामध्येच आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मुंबई पोलिसांना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. पोलिसांनी यानिमित्ताने नियमावली जाहीर केली आहे.