हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखों लोकांनी गर्दी केली आहे.कोरोना संक्रमणाची ना भीती ना धास्ती या लोकांमध्ये दिसत आहे. महाराष्ट्र, गुजरात सारख्या राज्यात कोरोनाचा आतंक माजलेला असताण कोणताही कोरोनाचा नियम न पाळता तिथे झालेली गर्दी पहाता कोरोनाचे संक्रमणाचा आकडा आता काय सांगणार आहे याची भीती सर्वसामान्यमाणसाला वाटते आहे.
कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता सोमवारी शाही स्नानात ३५ लाखांवर लोक सहभागी झाले. त्यापैकी १८,१६९ लाेकांची चाचणी करण्यात आली. त्यात १०२ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या म्हणण्याप्रमाणे कुंभमेळ्यात गंगामातेच्या कृपेने कोरोना फैलावणार नाही. हरिद्वारमधील कुंभक्षेत्र नीलकंठ व देवप्रयागपर्यंत मोकळ्या वातावरणात आहेत.