हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठी सिझन 3 च्या चावडीवर

0
87

बिग बॉस मराठीच्या सेटवर सलमान खानची धमाकेदार एंट्री होणार आहे. घरातील सदस्य सलमान खानला बघून खुश तर होणारच पण त्यांची इच्छा देखील पूर्ण होणार आहे असे म्हणायला हरकत नाही. या आठवड्याची बिग बॉस मराठीची चावडी सलमान खानच्या हजेरीत रंगणार आहे.नुकताच सलमान स्पेशल एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर म्हणतात, “आपल्या चावडीवर येणार आहे एक खास पाहुणा”. त्याचसोबत सलमान खानने देखील म्हणतोय, “मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर.”

‘अंतिम’चे प्रमोशन करणार सलमान खान सलमान खान आणि आयुष शर्माचा ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट 26 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट मराठीतील गाजलेल्या ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here