हिंदू खाटीक समाजास व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

0
23
अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना व एनएसएफडीसी योजना
हिंदू खाटीक समाजास व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी) मार्फत अर्जदारास व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना व एनएसएफडीसी योजना राबविण्यात येत आहे.

२०२५-२६ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जातीमधील हिंदू खाटीक या प्रवर्गामधील लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी गृहनिर्माण भवन, तळमजला रूम नं ३५, कलानगर, मुंबई शहर, बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०००५१, दुरध्वनी क्रमांक ०२२-३१६८९६७९ येथे संपर्क साधावा,असे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here