या वर्षातील पाहिले चंद्रग्रण आज दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी दिसणार आहे. चंद्रग्रहणाला प्रारंभ दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी होणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी ग्रहण समाप्त होणार आहे.आज बुद्ध पूर्णिमा आहे. तसेच आजचा दिवस हा मराठी महिन्यांप्रमाणे वैशाख महिना असून पौर्णिमेचा दिवस आहे,
आजचं चंद्रग्रहण पूर्व भारतातून दिसणार आहे त्यामुळे कोलकातामध्ये राहणाऱ्या लोकांना हे ग्रहण दिसणार आहे. कोलकातामध्ये हे ग्रहण दुपारी 3:15 च्या सुमारास सुरु होईल आणि संध्याकाळी 6:22 वाजता समाप्त होईल. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यामुळे त्याचा आकार हा मोठा दिसतो म्हणून त्याला ‘सुपर मून’ म्हणतात.
हे चंद्रग्रहण काही मिनिटांसाठी बंगाल आणि पूर्व ओडिशामध्ये दिसेल, तसेच भारताच्या पूर्व राज्यांमध्ये म्हणजेच अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यां भागात दिसेल.त्याशिवाय हे चंद्रग्रहण अमेरिका,उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि हिंद महासागराच्या काही भागात पूर्णपणे दिसून येईल. हे ग्रहण जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, सिंगापूर, बर्मा, फिलिपिन्स आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतही दिसून येनार आहे .
हे चंद्रग्रहण तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकता.तसेच जर तुम्हाला जास्त जवळून बघायचे असेल तर दुर्बीण वापरू शकता. हे उपछाया चंद्रग्रहण आहे, म्हणून ते पाहण्यासाठी, विशेष सौर फिल्टर चष्मा वापरू शकता.
उपछाया ग्रहण म्हणजे चंद्र पृथ्वीच्या वास्तविक सावलीत न येता. तिच्या उपछायेतून बाहेर निघतो. तेव्हा उपछाया ग्रहण लागते. उपछाया ग्रहण प्रत्यक्ष चंद्रग्रहण मानले जात नाही. या ग्रहणकाळात चंद्राच्या रंग आणि आकारात कोणताही फरक नाही. चंद्रावर फक्त एक पुसट छाया दिसते. खगोलशास्त्रीय शास्त्रानुसार, चंद्र आणि सूर्यामध्ये पृथ्वी येते आणि सूर्यप्रकाशाच्या चंद्रावर पडत नाही तेव्हा प्रत्यक्ष ग्रहण येते. या घटनेस चंद्रग्रहण म्हणतात.