भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई शहर जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाची हवामान सूचना जारी केली आहे. २६ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत समुद्र परिस्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी सावधानता बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे.
IMD च्या माहितीनुसार, केरळ किनारपट्टी, लक्षद्वीप, मालदीव लगतचा समुद्रप्रदेश, कोमोरिन क्षेत्र, तसेच मन्नारचा आखात या भागांमध्ये ३५ ते ५५ किमी प्रतितास वेगाचे जोरदार वारे वाहू शकतात. काही ठिकाणी हा वेग ६५ किमी प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या कालावधीत समुद्रात उधाण, जोरदार वार्यांचा प्रकोप आणि समुद्री प्रवाहांमध्ये अस्थिरता राहू शकते. त्यामुळे या भागात मासेमारीसाठी जाऊ नये, असा स्पष्ट इशारा हवामान विभागाने मच्छिमारांना दिला आहे.
मच्छिमारांनी हवामान अपडेट्स नियमित तपासावेत, सतर्क राहावे आणि समुद्रात जीवितास धोका पोहोचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असेही विभागाने आग्रहपूर्वक सांगितले आहे.


