प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
मुंबई- ३१ डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी निर्बंध घातले जातील. या दिवशी सर्व हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सर्व कोरोना प्रबिंधकाचे नियम पाळणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणार्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली. राज्यात निर्बंधाबाबत राज्य सरकार योग्यवेळी निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत आयोजित बैठकीतनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोनाचे आकडे वाढले पण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. तरीही वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. ३१ डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी निर्बंध घातले जातील.
कोरोनाच्या तिसर्या लाटेची सुरुवात असू शकेल, घाबरु नका रुग्णांची संख्या वाढणार नाही याची काळजी घ्या. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सर्व कोरोना प्रबिंधकाचे नियम पाळणे आवश्यक आहे. शाळा बंद करण्याचा कोणत्याही निर्णय नाही. राज्यात निर्बंधाबाबत राज्य सरकार योग्यवेळी निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.