९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा ३ डिसेंबरला

0
112

 ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा ३ डिसेंबर रोजी होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून सकाळी ८ वाजता सुरू होणा-या ग्रंथदिंडीपासून साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आहे. कुसुमाग्रज यांचे घर रोषणाईने फुलले आहे. दरम्यान, साहित्य संमेलनात कुठलीही उणीव भासणार नाही. त्यामुळे साहित्यप्रेमींनी साहित्य संमेलनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here