
₹10 लाखांवरील कार खरेदीत 1% TCS परतावा – असे मिळवा तुमचे पैसे
भारतात नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ₹10 लाखांपेक्षा अधिक किंमतीची कार खरेदी केली तर सरकारकडून आकारला जाणारा 1% TCS (Tax Collected at Source) प्रत्यक्षात ग्राहकाला परत मिळू शकतो. हा परतावा आधीच तुमच्या PAN कार्डाशी जोडलेला असतो, मात्र अनेकांना याबद्दल माहिती नसते.
हे पण वाचा चंद्रनगर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी
TCS म्हणजे काय?
महागड्या कार खरेदीवर सरकार डीलरमार्फत 1% TCS आकारते. उदाहरणार्थ:
-
₹10 लाखांची कार → ₹10,000 TCS
-
₹30 लाखांची SUV → ₹30,000 TCS
हा TCS तुमचेच पैसे आहेत आणि ते Income Tax Return (ITR) भरताना सहज परत मिळू शकतात किंवा करातून समायोजित होऊ शकतात.
TCS परतावा कसा मिळवायचा? (Step-by-Step)
-
कार खरेदी करताना डीलरकडून Form 27D जरूर मागवा.
-
ITR भरण्यापूर्वी Form 26AS किंवा AIS मध्ये TCS क्रेडिट दाखवत आहे का ते तपासा.
-
TCS एंट्री दिसत असल्यास ते परतावा म्हणून दावा करा किंवा आपल्या करात समायोजित करा.
-
ITR भरल्यानंतर परतावा तुमच्या बँक खात्यात जमा होतो.
TCS परताव्याबाबत कोणताही लपलेला नियम किंवा गुंतागुंत नाही. अनेकांना माहिती नसल्यामुळे कार खरेदीवर भरलेले हजारो रुपये परत घेतले जात नाहीत.
म्हणूनच, जर तुम्ही ₹10 लाखांहून अधिक किमतीची कार घेणार असाल, तर 1% TCS आपल्या नावावर क्रेडिट झालेला आहे याची खात्री करा आणि तो परत मिळवा.

