सावंतवाडीकर आता भूलथापांना भुलणार नाही, त्यामुळे विजय निश्चित

0
1
सावंतवाडीकर आता भूलथापांना भुलणार नाही, त्यामुळे विजय निश्चित
सावंतवाडीकर आता भूलथापांना भुलणार नाही, त्यामुळे विजय निश्चित

सावंतवाडीकर आता भूलथापांना भुलणार नाही, त्यामुळे विजय निश्चित

सावंतवाडी | प्रतिनिधी

आपण १९९१ पासून सामाजिक आणि राजकीय कार्य सातत्याने करत असून, सावंतवाडीची सुजाण जनता पुन्हा एकदा आपल्या पाठीशी उभी राहून आम्हाला विजय मिळवून देईल, असा ठाम विश्वास प्रभाग क्रमांक ५ चे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उमेश कोरगावकर यांनी व्यक्त केला आहे. येथील जनता आता भूलथापांना भुलणार नाही, त्यामुळे जनतेने मशाल या चिन्हाला मतदान करून ठाकरे शिवसेनेच्या पॅनलला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान कोरगावकर यांनी यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्यावर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आश्वासनावरून सावंतवाडीच्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला दीपक केसरकर यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे आश्वासन सावंतवाडीच्या जनतेला दिले होते.

सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची गंभीर समस्या असताना केसरकर यांनी साडेचार कोटींचा कारंजाचा प्रोजेक्ट आणला. त्या साडेचार कोटींमध्ये चांगल्या प्रकारे हॉस्पिटल निर्माण करता आले असते. परंतु, वरवरचे काम करायचे, दिखाऊपणा करायचा आणि फसवणूक करायची, हेच काम फक्त दीपक केसरकर यांनी केले आहे. पैसे वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, यापूर्वीही
निवडणुकीत पैसे वाटप झाले, पण सावंतवाडीची जनता सुजाण आहे. त्यांनी माझ्यासारख्या सच्चा कार्यकर्त्याच्या पदरात यश टाकले. कितीही पैसे वाटप झाले किंवा बाहेरून आलेल्यांनी कितीही वल्गना केल्या तरीही सावंतवाडीची जनता त्याला
भीक घालणार नाही. येथील जनता ठाकरे शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभी राहील आणि मशालीला मत देऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच निवडून देईल.
भाजप आणि शिंदे शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्या तरी, सत्ता स्थापन करण्याची वेळ येईल तेव्हा दोन्ही पक्ष मांडीला मांडी लावून एकत्र येतील, असा टोला कोरगावकर यांनी यावेळी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here