2021 मधील शेवटचे सूर्यग्रहण ४ डिसेंबरला होणार असून ते अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, अटलांटिकचा दक्षिणेकडील भाग, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिकेत दिसेल. भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे इथे सुतक काळ वैध राहणार नाही. सूर्यग्रहणाचा सुतक काळ ग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो. या काळात अनेक कामे करण्यास मनाई असते. धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण शुभ मानले जात नाही.
सूर्यग्रहण ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि दुपारी ३.०७ वाजता संपेल. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला ग्रहण होणार आहे. ग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र आणि बुध वृश्चिक राशीत असतील. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल जे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तेव्हा त्याच्या मागे सूर्याचा प्रकाश पूर्णपणे झाकतो.