बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. या वादळाचा तडाखा थेट महाराष्ट्राला बसणार नसला तरी हवामान खात्याने पावसाच्या हलक्या सारी बरसणार असल्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे.
23 मार्चपासून पुढील तीन दिवस पावसाच्या सरी दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि कोकणात कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.