पुष्य नक्षत्राची सुरुवात २८ ऑक्टोबरला सूर्योदयाने होईल. हे नक्षत्र दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ पर्यंत राहील. गुरुवारी पुष्य नक्षत्रात सूर्योदय झाल्यामुळे दिवसभर खरेदी आणि इतर शुभ कार्ये करण्याचे महत्त्व अधिक राहील.
गुरु-पुष्य संयोग हा प्रत्येक राशीसाठी शुभ आणि लाभदायक आहे. या शुभ संयोगात सर्व प्रकारची खरेदी आणि गुंतवणूक करता येते.28 ऑक्टोबर, गुरुवारी पुष्य नक्षत्रामुळे शुभ नावाचा योग तयार होत आहे. या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योगही असतील.गुरुवार असल्याने या योगात कुटुंबाच्या पोषणासाठी उपयुक्त गोष्टी खरेदी करता येतील. गुरु-पुष्य योगात औषधी व खाद्यपदार्थांची खरेदी करावी. या संयोगात शुभ आणि नवीन कार्ये, गुंतवणूक, आरामदायी वस्तू, मालमत्ता, वाहन, अग्नि, शक्ती-ऊर्जा वाढवणाऱ्या वस्तू आणि सोन्या-तांब्यापासून बनवलेल्या वस्तूंची खरेदी करणे खूप शुभ आहे.