रत्नागिरी- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 30 भूखंडधारकांना दणका दिला आहे. कारारनाम्यानुसार उद्योजकांनी घेतलेल्या भूखंडांचा विकास केलेला नाही. त्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवूनही दुर्लक्ष केले. काही भूखंडधारक नोटीसा जाणीवपूर्वक घेत नाहीत.
त्यामुळे येत्या 30 दिवसांमध्ये याबाबत भूखंडधारकांनी लेखी खुलासा करावा, अन्यथा करार रद्द करून ते भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई करू असा इशारा महामंडळाने दिला आहे. रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसीतील 9 भूखंड, कुडाळमधील 11, गाणेखडपोलीतील 4, साडवली 1, खेर्डी-चिपळूण 4 दापोली 1अशा 30 भूखंडधारकावर कारवाई करण्यात येणार आहे.