300 युनिटपर्यंत वीज माेफत देऊ- केजरीवाल

0
127

आम आदमी पार्टीने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशनंतर आता उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीतील प्रचारास सुरुवात केली आहे.उत्तराखंडच्या दाैऱ्यावर केजरीवाल आहेत. दिल्ली सरकार १०० युनिटपर्यंत वीज खर्च करणाऱ्या कुटुंबांना १०० टक्के अनुदान देत आहे. २०१ ते ४०० युनिटचा वापर करणाऱ्या कुटुंबांना वीज बिलात ५० टक्के अनुदान देत आहे. दिल्ली सरकारने दिल्लीत अशी याेजना लागू केली आहे. त्या याेजनेला उत्तराखंडमध्ये का लागू केले जाऊ शकत नाही? उत्तराखंडमध्येही बुधवारी ऊर्जामंत्री हरक सिंह रावत यांनी दर महिन्याला १०० युनिट वीज माेफत दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

उत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट वीज माेफत दिली जाईल. त्याचबराेबर थकबाकीदेखील माफ केली जाईल, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here