तालिबानी दहशतवाद्यांमुळे अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालिबानी दहशतवादी संघटनांनी रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर (Kabul) ताबा मिळवला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (afghanistan president ashraf ghani ) यांनी देखील तालिबान्यांसमोर शरणागती पत्कारत राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्या आणि ते पळून गेले. त्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये कायदे-कानून लागू करण्यास सुरुवात केली आहे. या कायद्याचा सर्वात जास्त फटका त्याठिकाणी असणाऱ्या महिलांना बसणार आहे.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील महिलांसाठी (Afghanistan Womens) 10 नवीन आणि कठोर नियम लागू (taliban created 10 rules for women) केले आहेत. शरियानुसार तयार करण्यात आलेल्या या नियमांचे पालन करण्याची महिलांना सक्ती करण्यात आली आहे. ऐवढेच नाही तर या नियमांचे उल्लंघन केले तर या महिलांना कठोर शिक्षेची (punishment) तरतूद देखील या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील महिलांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
तालिबान्यांनी महिलांसाठी तयार केलेले नियम –
– जवळचा नातेवाईक सोबत असल्याशिवाय महिलांना घराबाहेर जाता येणार नाही.
– घराबाहेर जाताना महिलांना बुरखा परिधान करणे बंधनकारक आहे.
– महिलांच्या येण्याची चाहूल पुरुषांना लागता कामा नये. यासाठी महिलांनी पायात हिल्स वापरू नये.
– सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांसमोर महिलांचा आवाज ऐकू येता कामा नये.
– तळ मजल्यावर असलेल्या घरांच्या खिडक्यांच्या काचा रंगवलेल्या असल्या पाहिजे. जेणे करुन घरात राहणाऱ्या महिला दिसणार नाहीत.
– महिलांना फोटो काढण्यास बंदी असेल. महिलांची छायाचित्रे वृत्तपत्रे, पुस्तक आणि घरांमध्ये लावता कामा नये.
– महिला शब्द कुठल्याही जागेच्या नावावरुन हटवण्यात यावा.
– घराच्या बाल्कनीमध्ये तसेच खिडकीमध्ये महिला दिसता कामा नये.
– महिलांनी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता कामा नयेत.
– महिलांनी नेल पेंट लावता कामा नये. तसंच त्यांनी कुटुंबियांच्या मर्जीशिवाय लग्न करु नये.
नियमांचे उल्लंघन केल्यास ही शिक्षा
-महिलांना तालिबान्यांनी तयार केलेल्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना कठोर शिक्षा दिली जाणार.
– महिलांना सार्वजनिकरित्या अपमानित केले जाईल. बेदम मारहाण करुन त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते.
– अवैध संबंध असलेल्या महिलांना सार्वजनिकरित्या मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते.
– टाईट कपडे घालणाऱ्या महिलांना देखील अशीच शिक्षा दिली जाते.
– एखाद्या मुलीने लग्नातून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तिचे नाक आणि कान कापले जातात आणि तिला मरण्यासाठी सोडले जाते.
– महिलांनी नेलपेंट लावल्यास त्यांची बोटे कापली जातात.


