रत्नागिरी : कोकण रेल्वे 24 मार्चनंतर विजेवर धावणार

0
213
कोकण रेल्वेसाठी ऐतिहासिक दिवस! पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनवर एक्सप्रेस चालली

प्रतिनिधी -अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी- रत्नागिरी ते वेर्णा या टप्प्यातील कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. अंतिम टप्प्यातील चाचणी 22 आणि 24 मार्चला होणार आहे. त्यानंतर लवकरच कोकण रेल्वेवर सगळ्या गाड्या विजेच्या इंजिनवर धावतील.

गेल्याच महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव-थिवी मार्गांवर विद्युतीकरणाची चाचणी झाली. मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतचा सलग मार्ग विद्युतीकृत असल्यामुळे सध्या रत्नागिरीपर्यंत मालगाड्या तसेच दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनासह चालवली जात आहे. तसेच रेल्वे गाड्या विजेवर धावल्यामुळे डिझेलवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. तसेच धुरामुळे होणारे प्रदूषण आता होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here