ब्रेकिंग – चीनमध्ये १३२ प्रवाशांना घेऊन जाणारे ७३७ बोईंग विमान कोसळून भीषण अपघात

0
166
चीनमध्ये १३२ प्रवाशांना घेऊन जाणारे ७३७ बोईंग विमान कोसळून भीषण अपघात

चीनमध्ये आज दुपारी 133 प्रवाशांना घेऊन जाणारे चायना ईस्टर्न एअरलाईंसचे बोईंग-737 जातीचे एक विमान गुआंग्शी शहरालगतच्या डोंगर रांगांत कोसळले. हे विमान क्वानमिंगहून ग्वांगझूला जात असताना गुआंग्झी भागात कोसळले. या विमानात 133 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात किती जण जखमी झाले आहेत किंवा किती प्रवासी सुखरूप आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.विमानात 9 क्रू मेम्बर्स होते. ज्या डोंगरावर हे विमान क्रॅश झाले, तेथील काही छायाचित्रे उजेडात आली आहेत. त्यात घटनास्थळावरुन आगीचे लोळ उठताना दिसून येत आहेत.हे विमान 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात तब्बल 30 हजार फूट खाली कोसळल्याची माहिती आहे.

उड्डाणानंतर अवघ्या 71 मिनिटांतच ते कोसळले. लँडिंगपूर्वी 43 मिनिटे अगोदर त्याचा ATC शी असणारा संपर्क तुटला होता.अपघातग्रगस्त विमान साडेसहा वर्षांपासून कंपनीच्या ताफ्यात होते. या अपघाताविषयी चायना ईस्टर्न एअरलाईंसचे अद्याप कोणतेही निवेदन जारी केले नाही.चीनमध्ये शेवटचा जेट अपघात 2010 मध्ये झाला होता. तेव्हा हेनान एअरलाइन्सचे एम्ब्रेर ई-190 प्रादेशिक जेट कमी दृश्यमानतेत यिचुन विमानतळाकडे जाताना क्रॅश झाले होते. या दुर्घटनेत विमानतील 96 पैकी 44 जणांचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here