सिंधुदुर्ग – ओरोस येथे महाराष्ट्र शासनच्या पर्यटन संचालनालयाच्या वतीने गाईड प्रशिक्षणाचे उदघाटन

0
320

प्रतिनिधी -अभिमन्यू वेंगुर्लेकर

ओरोस – ओरोस येथील एमटीडीसीच्या कार्यालयात पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज उद्घाटन झाले. कार्यक्रमाची सुरुवात ॲड. पार्सेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या प्रशिक्षण केंद्रामुळे स्थानिक युवकांना ‘पर्यटक गाईड प्रशिक्षण’ देऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. गाईड हा पर्यटन स्थळ परिसरातील अत्यंत अचूक आणि महत्त्वाची माहिती देत असतो. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मन लावून हे प्रशिक्षण घ्यावे आणि आलेल्या संधीचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) कोकण विभाग, नवी मुंबई यांनी केले.

पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी या उददेशाने पर्यटन विभाग , महाराष्ट्र शासनच्या पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबईच्यावतीने दिनांक 21 मार्च 2022 ते 25 मार्च 2022 या 5 दिवसाच्या प्रशिक्षण सिंधुदुर्ग ओरस येथील कॉन्फरन्स हॉल, एमटीडीसी ओरस या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. . या प्रशिक्षण शिबीरामध्ये 30 जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कालावधीत पर्यटन संचालनालयामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ओळख पत्र ही देण्यात येणार आहे. यावेळी बोलताना ॲड. पार्सेकर म्हणाले, सिंधुदुर्गला निसर्ग संपदा लाभली असुन ‘अतिथी देवो भव’ ही संकल्पना रुजवण्यासाठी गाईड ट्रेनिंग ही महत्त्वाची बाब आहे. आदरतिथ्य हा पर्यटनचां मूळगाभा असुन ही एक सामूहिक जबाबदारी आहे. रिक्ष चालक, टॅक्सी चालक, होटेल व्यावसायीक, गाईड या सर्वांनी पर्यटनातील आदरतिथ्यचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यामुळे देण्यात येणारे गाईड ट्रेनिंग ही एक चांगली संधी असुन याचा सुयोग्य वापर प्रशिक्षणार्थ्यांनी करावा आणि एक उत्कृष्ट गाईड तयार व्हावे.

यावेळी सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसाय संघाचे सचिव ॲड. नकुल पार्सेकर, सावंतवाडी तालुका पर्यटन महासंघाचे अध्यक्ष जितेंद्र पंडीत, सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचे सदस्य विजय गोंदवले, आय आय टी टी एम ग्वाल्हेरचे डॉ. रामकृष्ण कोगाला आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here