उत्तर प्रदेश विधानसभेच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा पहिला मान योगी आदित्यनाथ यांनी यूपीच्या निवडणुकीने मिळविला आहे. 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे योगी आदित्यनाथ भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत.लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (एकना स्टेडियम) येथे दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
योगींनी अनेक विरोधी नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे.मला कोणताही प्रशासकीय अनुभव नव्हता, पण 2017 मध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज यूपी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे असे योगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.