
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात विविध विकासात्मक कामांसाठी दौरा करणार आहेत. त्याचा प्रारंभ कोकणातून हाेणार असून, २८, २९ आणि ३० मार्च रोजी ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड दौऱ्यावर येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

