प्रतिनिधी -अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग- कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते मडगाव विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या विद्युतीकरणाच्या कामाची आज रेल्वेच्या सुरक्षा तपासणी पथकाने लोको ट्रेन चालवून चाचणी घेतली. या चाचणीसाठी आलेल्या सीआरएस पथकाने मडगाव ते रत्नागिरी अशी इलेक्ट्रिक लोकोची ट्रायल घेतली. या तपासणीत झालेले विद्युतीकरणाचे काम योग्य असल्याबाबतचा निर्वाळा पथकाकडून देण्यात आल्याचे समजते. या पाहणी अहवालानंतरच विद्युतीकरणाद्वारे कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक केव्हा सुरू होईल हे निश्चित होणार आहे.


