राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्याप्रमाणे येत्या 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार आहे.राज्य सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे सीएनजी गॅसवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सीएनजीवरील मुल्यवर्धित कराचा दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना शुक्रवारी केली होती.राज्यात सीएनजी आणि पीएनजीचे सुधारित दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
रशिया युक्रेन युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेल महागच होणार म्हणूनच गॅसवरचा कर कमी केला आहे.अर्थसंकल्पात नैसर्गिक वायूवरील कर 10 टक्के कमी करण्यात आला आहे. पण पेट्रोल डिझेलवरील करात कोणताही बदल झालेला नाही.


