कोकणात राजकीय वर्तुळात काल धुमशान चालू होते.एकीकडे ३०० ते ४०० लोकांच्या जमवाबरोबर निलेश राणे व किरीट सोमय्या अनिल परब यांचे रिसाॅर्ट तोडण्यासाठी निघाले मात्र त्यापुर्वी ते दापोली पोलिस ठाण्यात पोहचले. कार्यकर्त्यांना आत येण्यास पोलिसांनी अडवून दोघांनाही अटक केली. “चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा” नारा देत सोमय्यांनी एक मोठा हातोडा मिडीयाला दाखवत हे जनतेच्या भावनेचे प्रतिक आहे, असा दावा केला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे ‘एसपी बदमाश आहे’ असे वक्तव्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारे होते. सत्तेतील जनतेने निवडून दिलेला नेता सरकारच्याच जनतेला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याला अशा शब्दात बोलतो आहे हे बघून जनता संभ्रमात पडली आहे.पोलिसांनी आम्हाला अटक केली असून आम्हाला पोलिस रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर नेऊन सोडणार आहे अशी माहिती खुद्द किरीट सोमय्या यांनी दिली. दरम्यान या वेळेत साई रिसॉर्ट परिसरात मीडियाला चित्रीकरण करण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे.


